बेळगाव जिल्ह्यात भाजपला अच्छे दिन येणार का हाच लाख मोलाचा प्रश्न आहे गेल्या काही वर्षात भाजपने बेळगाव जिल्ह्यात चढ उतार बघितला आहे त्यातच बेळगाव सहं मराठी बहुल भागात एकीकरण समिती आणि भाजप हे दोघे मराठी वोट बँकेवर डोळा ठेऊन आहेत . मात्र भाजपला मराठी मते मिळवता येत नाहीत ही वस्तुस्थिती असून केवळ हिंदुत्वाच्या जोरावर भाजपचा टिकाव लागेल का हा प्रश्न आहे.
आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव भाजप मध्ये अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. भाजपची विजयी पताका कोणत्याही स्थितीत कर्नाटकात शाबूत ठेवायची आहे त्यामुळे वेगवेगळ्या रणनीती डोळ्यासमोर ठेऊन सगळे कार्यक्रम आखण्यात येत आहेत, वास्तविक विधान सभा निवडनूकीच्या अगोदर जन माणसातला सेन्स जाणून घेण्यासाठीच पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी रणनीती चालू केली आहे त्याचाच हा एक भाग आहे .
गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री बी एस येदुराप्पा आणि काल दोन दिवस केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड हे येऊन गेले येदुराप्पानी जिल्हा भाजप नेत्यात नसलेला ताळमेळ आणि असामांजस्य पाहून कान पिचक्या केल्या होत्या तर राठोड यांच्या सभातून खुर्च्या खाली होत्या. याचाच अर्थ भाजपच्या योजना अजूनही तळागाळात पोचल्या नाहीत नेत्यात असहकार्य भावना आहे हेच दिसून आले आहे .
२०१८ च्या निवडणुकीच्या अगोदर पक्ष श्रेष्ठींना जो संदेश पोचवायचा आहे त्यासाठीच अनेक दिग्गज भाजप नेते बेळगावात दाखल होत आहेत केंद्रीय मंत्री तीन दिवस मुक्काम करणे अनेक कार्यक्रमात सहभाग घेणे चिकोडी बेळगावात कार्यक्रम करणे हे सगळ पुढील विधान सभा निवडणुकीची रणनीती आहे .
राठोड यांच्या उत्तर भागातील पक्षाच्या कार्यक्रमात अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली होत्या तर दक्षिणेतील कार्यक्रमात विणकर समाजाने पाठ फिरवली होती म्हणावी तेवढी गर्दी नव्हती त्यामुळे सध्य स्थितीत भाजप संघर्ष करत असल्याचे चित्र आहे . मोदी फेस्ट च्या उद्घाटनाला मिळालेला अल्प प्रतिसाद उपस्थितात विधान सभेला इच्छुकांचीच संख्या अधिक हे सगळ पाहिल तर बेळगाव भाजप संघर्ष करत आहे असच म्हणाव लागेल .
भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला असता इच्छुकांची भाऊगर्दी आणि अंतर्गत राजकारणच भाजपला महागात पडण्याची चिन्हे आहेत.
भाजपा च्या पाखण्डि हिंदुत्ववादी ला व काँग्रेस च्या छद्मी सेकलर वादाला सीमा भागातील मराठी भाषिकांनी बळी पडू नये।
सीमा भागातील मराठी लोकांवर जेंव्हा अत्याचार होतात तेंव्हा हिंदू म्हणवून घेणारे कन्नड भाषिक मूग गिळून गुमान बसलेले असतात। तर स्वतःला secular म्हणवून घेणारे कन्नड भाषिक डोळ्यात काजळ घालून बसलेले असतात।