कळसा भांडुरा पाणी वाटप सोडविण्यासाठी आपण महाराष्ट्र आणि गोव्यातील विरोधी पक्षाला सांभाळाव मी फडणवीस आणि पर्रीकर यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी राजी करतो असे आवाहन माजी मुख्यमंत्री बी एस येदुरापा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिला आहे .
विधी मंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर हे दुष्काळाचा प्रश्न उपस्थित करत आहेत तर मी उत्तर कर्नाटकातील दुष्काळ ग्रस्त १३ जिल्ह्याचा प्रवास कार्यक्रम हाती घेतला आहे. २०१६ -१७ मध्ये उत्तर कर्नाटकात दुष्काळ पिडीत भागात ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली असून हा वाद संपवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही राजी करू कॉंग्रेस ने फक्त विरोधी पक्षांना सांभाळाव अस आवाहन करत जल लवादाच्या बाहेर प्रश्न सोडवू असंही ते म्हणाले .
आगामी विधानसभ निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास चार मंत्री कार्यालये बेळगावातील सुवर्ण विधान सौध मध्ये स्थलांतरीत करू असंही ते म्हणाले .