आजच्या तरुणांनी ग्रामीण शहरी असा न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परिक्षेला कसे सामोरे गेले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात सातत्य कसे टिकवता येईल. स्पर्धा परीक्षा स्पर्धे मध्ये टिकण्यासाठी तयारी कशी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा हि तरुणांना खूप मोठी संधी आहे ती मिळवण्यासाठी तयारी कशी केली पाहिजे याची माहिती बेळगाव जिल्ह्यातील कारदगा येथील गेल्या वर्षी आय ए एस पूर्ण केलेले अभिजित शेवाळे यांनी बेळगाव live कडे दिली आहे.
अभिजित सध्या पश्चिम बंगाल मधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याचे सहाय्यक दंडाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी पदी कार्यरत आहेत.
1)ग्रामीण भागातल्या मुलांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना असणारा अनेक गोष्टींचा अनुभव. उदाहरणच द्यायचे असेल तर घ्या हुरड्याचे..शहरी भागातल्या मुलांना याची माहिती असणे अवघड आहे..
नांगरणी, खुरपणी, शेतीतील अवजारे, जनावरे, वेगवेगळे ऋतू, पंचायतराज, शासकीय अधिकारी यांच्याशी जितका आपल्या ग्रामीण भागातील मुलांचा संबंध येतो, तितका शहरी भागातल्या मुलांचा येत नाही..त्यामुळे आपला पाया भक्कम असतो..जर त्याला प्रयत्नांची जोड दिली तर अवघड काहीच नाही..
2) अलीकडे स्पर्धा परीक्षा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय झालाय..याच्यामागे वाढता awareness कारणीभूत आहे..पण यामुळे या क्षेत्रातील स्पर्धाही वाढत आहे..म्हणूनच या परिक्षांचा लवकर अभ्यास चालू करणे, क्रमप्राप्त ठरत चाललेय..पदवी परिक्षेचा प्रथम वर्षापासूनच अभ्यास चालू केला तर खूप फायदा होतो..तसेच या क्षेत्रात सातत्य खूप महत्वाचे आहे..ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी दोन वर्षाचा कालावधी लागतो, तर तशी मानसिक तयारी करुनच या क्षेत्रात आले पाहिजे..या परिक्षेविषयी खूप मोठे गैरसमज आपल्या समाजात आहे की, ही परिक्षा पास होण्यासाठी 18 ते 19 तास दररोज अभ्यास करावा लागतो..पण मी माझ्या अनुभवावरुन सांगतो की मी कधीही 9 तासापेक्षा जास्त अभ्यास केला नाही..किती अभ्यास यापेक्षा “कसा” अभ्यास करतो याला महत्व आहे.।
3)स्पर्धा परीक्षेसाठी भारतातून जवळपास दहा लाख मुले दरवर्षी सहभागी होतात आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे परीक्षेत केवळ एक हजार जागा असतात म्हणजेच उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 1% इतके आहे. अशा जीवघेण्या स्पर्धा मध्ये जर टिकायचे असेल तर सातत्यपूर्ण अभ्यासाला पर्याय नाही. शाळेपासून जर पाया भक्कम असेल तर खूप फायदा होतो. गणित,इंग्रजी, विज्ञान ,समाज विज्ञान, या सर्व विषयांचा पाय भक्कम असणे खूप गरजेचे आहे पण जर हे विषय कच्चे असतील तर सुरुवातीलाच ncert ची पुस्तके घेऊन उजळणी करणे फायदेशीर उरते. त्यासाठी 5 ते 12वी पर्यंतची समाज विज्ञान, विज्ञान,इतिहास ,ही पुस्तके सखोलपणे वाचणे गरजेचे आहे.
खूप वेळा मुले प्रश्न विचारतात कि क्लास लावणे गरजेचे आहे का? माझे मत असे आहे की ,क्लास लावण्याचा फायदा होतो पण तो आवश्यक आहे असे नाही. मी कोणताही क्लास न लावता हि परीक्षा दोनदाच उत्तीर्ण होऊ शकलो तर कोणी ही क्लास न लावता ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते.
अजून काही मुले प्रश्न विचारतात कि इंग्रजी मध्येच ह्या परीक्षा द्यायला हव्या का? माझ्या मते इंग्रजीचे कामचलाऊ ज्ञान असेल तरीही ही परीक्षा उत्तीर्ण होता येते आणि महत्वाची म्हणजे मराठी मध्ये अथवा कानडी मधून ही परीक्षा देऊ शकता पण खरे सांगायचे झाले तर तुमची इंग्रजी जेवढी चांगली असेल तेवढा तुम्हाला फायदा होतो. कारण स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी वर्तमानपत्रे ,मासिके ही इंग्रजी मध्ये उपलब्ध असतात. माझी मातृभाषा मराठी आहे आणि माझे दहावी पर्यंतचे शिक्षणही मराठीतच झाले पण मला याचा कुठे ही अडचण आली नाही. कारण मी लहानपणापासून इंग्रजी शिकण्यावर भर दिला होता. जर तुम्ही इंग्रजी बद्दल अवास्तव भीती बाळगत असाल तर आजपासूनच इंग्रजी शिकण्याच्या तयारीला लागा. या जगात अवघड असे काहीच नाही.
4) स्पर्धा परीक्षा ही तरुणांसाठी खूप मोठी संधी केवळ केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र अथवा कर्नाटक राज्यसेवा अयोगाच्या परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा नाही ,तर इतर खूप साऱ्या परीक्षा आहेत . ज्यांच्यासाठी आपण तयारी करू शकतो. Staff Selection Commission , Banking (IBPS),RBI या सारख्या परिक्षामधून प्रत्येकवर्षी जवळपास 30 हजार जागा भरल्या जातात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या परिक्षेची तयारी करायची आहे,याचा पहिल्या पासूनच फोकस ठेवणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला UPSC करायची आहे तर तुम्हाला किमान दोन वर्षे या परीक्षेसाठी स्वतःला वाहून घ्यावे लागते. खूप सारी मुले upsc सोबत इतर परीक्षा हि देतात आणि इथेच त्यांची चूक होते.
तसेच कोणत्या ही परीक्षेसाठी एकच मंत्र असतो की कमी पुस्तके वाचा पण त्याची उजळणी सारखी सारखी करा. हा मूलभूत मंत्र खूप जणांकडून विसरला जातो आणि ते खूप सारी पुस्तके वाचण्याच्या नदी लागतात पण हे चुकीचे आहे. वाचलेल्या पुस्तकांची उजळणी करणे त्याच्या नोट्स काढणे हे खूप महत्वाचे आहे, किंबहुना सर्वात महत्वाचे आहे.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जितक्या शक्य होईल तितक्या सराव परीक्षा देणे याचा फायदा असा होतो की, आपल्याला काम वाचायचे आहे आणि किती वाचंचव आहे याचा आबाका येतो. त्यामुळे अनावश्यक वाचणे टाळले जाते. सारख्या सराव परीक्षा लिहिण्यामुळे लिखाणाचा सराव होतो आणि वेगात लिहिताना ही हस्ताक्षर खराब होत नाही. आपल्याला परिक्षेत काय लिहायचे आहे, कोणत्या आकृत्या काढायच्या आहेत, याचा अंदाज येतो. म्हणून सराव परीक्षाआणि नोट्स काढणे खूप महत्वाचे असते.
(या परीक्षेसाठी कोणते
पुस्तक वाचायचे ,व कशी वाचावी याची सर्व माहिती माझ्या फेसबुक प्रोफाइल वर म्हणजे DrAbhijit Shevale या प्रोफाइल वर आहे)