स्थायी समिती अध्यक्ष पदावरून महानगरपालिकेत चार गट पडले आहेत, सत्तेच्या लालसेपोटी लोकप्रतिनिधींचे लॉबिंग पहायला मिळत असून स्थायीचे भवितव्य काय हा प्रश्न गंभीर आहे.
सत्ताधारी गटाला महापौर निवडीवरून पडलेले खिंडार अजून भरून निघाले नाही. सत्ताधारी गटनेते बदला ही मागणी दुर्लक्षिली गेल्यामुळे हे चित्र आहे. सत्ताधारी गटाने आज घेतलेल्या बैठकीत फक्त २२ नगरसेवक उपस्थित होते.
आमदार संभाजी पाटील परगावी गेले आहेत, ते आल्यावर सर्व 32 नगरसेवक एकत्र येऊन निर्णय होऊ शकेल असे वाटते.
शनिवारी स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्याचा एकच दिवस असून योग्य निर्णय घ्यावा लागेल. सार्वजनिक बांधकाम खात्याचे स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर यांनी आपणास दुसऱ्यांदा अध्यक्ष पद द्या अशी मागणी केली आहे त्यांचं कार्य पाहिलं तर आमदार संभाजी पाटील यांना गुंजटकर यांना दुसऱ्यांदा मुदत वाढ द्यावी लागेल एकूणच स्थायी समिती साठी देखील आर्थिक हालचाली होणार यात शंका नाही