जी रघु यांच्या नेतृत्वाखालील बेळगाव एसीबी च्या पथकाने पुणे बंगळूर महामार्गावर कोगनोळी या गावाच्या हद्दीत असणाऱ्या वाणिज्य कर खात्याच्या तपास नाक्यावर धाड टाकून तिघांना अटक केली आहे.
वाणिज्य कर खात्याचे अधिकारी शंकर रामचंद्र अंबुरे , निरीक्षक इरप्पा परप्पा वंडल, अटेंडर प्रकाश चनांप्पा कोलकार आणि सचिन बसवराज पाटील हा बाहेरील व्यक्ती असे चवघे या ठिकाणी आढळून आले. खासगी प्रवासी वाहतूक दारांकडून ते लाच उकळत होते. अशा प्रकारे उकळलेले १३६४० रुपये हाती लागले आहेत.
बाहेरील राज्यातील खासगी वाहनांकडून लाच घेतली जात असल्याच्या तक्रारी आल्याने ही धाड मारण्यात आली. अटकेतील तिघांना जिल्हा न्यायालयासमोर हजर करून हिंडलगा जेल मध्ये घालण्यात आले आहे.
एसीबी चे अधिकारी वाय एस धरनाईक, व्ही डी कब्बूरी, एस एस माष्टगी, आर जी पाटील, बी सी गौडर, बी जी यलिगार, आर बी मावकर, एम एन मठद, ए एस गस्थ यांचा टीम मध्ये समावेश होता.