हाय बंगळूरू चे संपादक रवी बेळ्गेर आणि यलहंका व्होईस चे जेष्ठ पत्रकार यांच्या वर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बेळगावातील पत्रकार आणि विविध सामाजिक संघटनांनी निदर्शन केली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पत्रकार ,सामाजिक संस्था आणि भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराच्या वतीने निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्या द्वारे राज्यपालांना दिले. दोन्ही पत्रकारांच्या विरोधात विधान सभेच्या हक्कभंग समितीने अटकेचे आदेश दिले आहेत याचा तीव्र शब्दात दोन्ही संघटनानी विरोध केला आहे .
जेष्ठ कन्नड पत्रकार सरजू काटकर यांच्या नेतृत्वात कन्नड नेते अशोक चंदरगी सह अन्य पत्रकारांनी निदर्शन केली तर भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांच्या नेतृत्वात अनेक समाज सेवकांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देत या कारवाईचा विरोध केला .