भारताचा प्रतिस्पर्धी वैरी पाकिस्तान ला पाठिंबा देऊन फटाके फोडणाऱ्या एकास संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.असिफ अत्तार वय 25 अस पाकिस्तान जिंदाबाद अश्या घोषणा देणाऱ्या युवकाच नाव आहे.
रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात icc चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना झाला होता त्यात भारतीय संघास दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मॅच दरम्यान हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात भारत सामना हरल्यावर पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या होत्या फटाके वाजवले होते.
या घटने नंतर हेब्बाळ ग्राम पंचायत सदस्य विजयकुमार यमकनमर्डी यांनी दिलेल्या तक्रारी वरून हा गुन्हा नोंद केला असून असिफ अत्तार ला अटक करण्यात आले आहे. असिफ सोबत साईर मुल्ला इलियास मुल्ला हे टेरेस वर फटाके वाजवून पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देत होते. एक आरोपीस अटक करण्यात आले असून दोघे जण फरारी आहेत
Trending Now