मान्सून पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या चिंतेत वाढ केली आहे चांगला पाऊस पडले असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना देखील पाऊस लांबला आहे त्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी भात व इतर पिकांची पेरणी केली आहे . मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने तेंव्हा पासून दडी मारली आहे , गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बेळगाव शहर आणि जिल्हात कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती , या वर्षी तरी चांगला पाऊस पडले या अपेक्षेत असलेल्या बळीराजा वर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट येणार की काय याची चिंता सर्वाना लागून राहिली आहे.
येत्या 8 दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर काही भागामध्ये पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे , त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या बळीराजावर आर्थिक ताण पडणार आहे , कमी पावसामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून येणाऱ्या दिवसात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये या साठी आता पासूनच अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
राकसकोप , हिडकल या धरणांमधील पाण्याची पातळी देखील कमी होत आहे त्यामुळे शहरवाशीयांना देखील पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे, गेल्या वर्षी बेळगाव जिल्ह्यातील 8 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर केले होते , मात्र जाहीर केलेला निधी देण्यास बराच विलंब झाला होता.