देशात अनेक सहकारी संस्था आहेत कोणतेही चांगले कार्य करण्यासाठी पैश्याची कमतरता नाही पण चांगल्या कार्यकर्त्यांची वानवा आहे कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या पाहिजेत त्या संस्थातून स्व नारायणराव जाधव यांच्या सारखे कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत असे विचार तरुण भारत परिवार समूह संपादक किरण ठाकूर यांनी व्यक्त केले .
कै नारायणराव गुंडोजी जाधव यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या उद्घाटन समारंभ व कर्मयोगी स्मरणिकेचे उद्घाटन रविवारी दुपारी शहापूर कोरे गल्लीतील गंगापुरी मठात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ सुरेश पाटील, स्मरणिका उद्घाटन म्हणून किरण ठाकूर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ कृष्णा मेणसे होते .
नेताजी जाधव यांनी प्रास्तविक करून उपस्थितांच उद्घाटन केल कृष्णा मेणसे यांनी दीपप्रज्वलन किरण ठाकूर यांनी स्व नारायणराव जाधव प्रतिमेचे पूजन केल .प्रतिष्ठानचे सचिव व्ही एस जाधव आणि अध्यक्ष माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी जाधव यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला .यावेळी नेताजी जाधव ई श्रीधर जाधव यांनी पहिला हप्ता म्हणून दीड लाखांचं धनादेश प्रतिष्ठान मदत दिली तर यावेळी अनेक जणांनी देणग्या जाहीर केल्या.
नारायणराव जाधव यांचे कार्य शहापूर पुरता मर्यादित नव्हते ते तालुक्यातही फिरायचे खऱ्या अर्थाने त्यांनी समाजसेवा केली होती . सडेतोड आणि स्पष्ट बोलल्यामुळ जाधव यांना घरी जाऊन समजा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आल होत अस मत डॉ सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या १२० कोटीच्या देशात ५० कोटी लोक अशिक्षित आहेत जो पर्यंत देशातील १०० टक्के साक्षर होत नाही तोवर देश सुधारला अस म्हणता येत नाही आज देशाला खऱ्या अर्थान नारायणराव जाधव सारख्यांची गरज आहे आहे असे मत कॉ कृष्ण मेणसे यांनी व्यक्त केले .