Tuesday, April 30, 2024

/

दारू प्यायला पैसे न दिल्याने मुलाकडून आईचा खून

 belgaum

दारू प्यायला पैसे न दिल्यान मुलांन चक्क आपल्या आईचा खून करत आई आणि मुलगा या पवित्र नात्याला काळिमा लावणारी घटना काकती पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात घडली आहे.

बेळगाव तालुक्यातील गुग्र्यानट्टी गावातील ही घटना आहे.सुरेश देसूरकर वय 28 याने आपल्या आई कडून दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर न दिल्याने खून करून फरारी झाला होता त्यास काकती पोलिसांनी अटक केली आहे.

काकती पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीत सांगितले की सुरेश याने शुक्रवारी रात्री आपल्या आई कडून दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली होती पैसे न दिल्याने काठीने आईच्या डोक्यात वार केला होता.मुलांकडून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या आईचा सकाळी मृत्यु झाला आहे.
आपल्याच मुलाच्या हल्ल्यात पार्वती देसुरकर वय 65 अस मयत पावलेल्या आईच नाव आहे.या प्रकरणी काकती पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी फरारी आरोपीस अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.