पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीतील अनेक नेते कार्यकर्ते आणि संघटना देखील राष्ट्रीय पक्षांच्या मागावर आहेत. समितीचे काही नेते भाजप तर काही काँग्रेसच्या वाटेवर आहेत.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडुरप्पा यांची भेट घेऊन पक्षात सामील होण्याची चर्चा केल्या नंतर अजून बरेच नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षांच्या वाटेवर आहेत.
मध्यवर्ती समिती विश्वासात घेत नाही म्हणून मराठी भाषिक युवा आघाडी चे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी राजीनामा दिला होता कार्यकर्त्यांच्या आग्रहा वास्तव काही दिवसा पुरता त्यांनी तो माघारी घेतला आहे ही घटना ताजी असताना ग्रामीण भागातील अनेक नेते राष्ट्रीय पक्षाच्या वाटेवर आहेत तर काही जणांनी प्रवेश देखील केलाय.
राजहंसगड येथील मागील तालुका पंचायतीत कमी मतांनी पराभूत झालेले दत्ता पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष येडुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. पवार यांच्या सारखे कट्टर मराठी प्रेमी कार्यकर्ते समिती सोडून का राष्ट्रीय पक्षा कडे जात आहेत याचा विचार समिती नेत्यांनी करायला हवा.बेळगाव live ने अनेकदा युवकाना समितीत कार्य करण्याच्या आणि निर्णय प्रक्रियेत सामील करून घ्या असा सल्ला दिला होता मात्र समिती नेतृत्वाने याकडे कानाडोळा केला आहे.समिती नेत्यातील अंतर्गत मतभेद हेकेखोर पणा याला कारणीभुत आहे का याचदेखील आत्मचिंतन करावं लागणार आहे.
सोमवारी 12 जून रोजी होणाऱ्या मध्यवर्ती बैठकीत सर्व समावेश निर्णय घेतले जावेत हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे . मराठी भाषिक कार्यकर्ते असेच दुरावले गेले कार्यकर्त्यांची गळती अशीच सुरू राहिल्यास आगामी विधान सभा निवडणुकीत याचे दूरगामी परिणाम होतील यात शंका नाही.
समितीच्या जेष्ठ नेत्यांनी डॅमेज कंट्रोल करणं शिकलं पाहिजे निवडणुका असोत किंवा आंदोलन, कार्यकर्ते पाहिजेतच यामुळे मराठी भाषिक युवा आघाडी बद्दलचा निर्णय असेल किंवा आणखी कोणत्या कार्यकर्त्या बद्दलचा निर्णय असेल खूप विचार पूर्वक घ्यायला हवा..
ज्यांची समीतीप्रती निष्ठा कमकुवत आणी दोन हाना पण पाटील म्हणा अशी वृत्ती आहे ते जाणार त्यांची जास्त काळजी न करता सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील याचीकेकडेच समीतीने जागृत होऊन लक्ष देण्याच ठरवलय.ज्यांना ज्यांना जायच आहे त्यांनी जावच.