मन्नूर गावची सुपुत्री कुमारी ऐश्वर्या उर्फ लीला उमेश नाईक ह्या अनाथ मुलीला शैक्षणीक साहित्याची मदत करण्यात आली.ऐश्वर्या च्या माघारी तिच्या आजी बाई एकट्याच आहेत.बिकट परिस्थिती मुळे त्यानी ऐश्वर्याचे शिक्षण थांबविण्याचा निर्णय घेतला होता.
ही बातमी समजल्या नंतर तिथे समिति च्या कार्यकर्त्यांनी लगेच धाव घेतली आणि ऐश्वर्याला मदतीचा हात दिला.ह्यावेळी तिला वह्या पुस्तक बूट आदी शालेपयोगी साहित्य देण्यात आले. इथून पुढील या मुलीचा शिक्षणाचा सर्व आर्थिक खर्च करण्याचा निर्णय या युवकांनी घेतला आहे. ह्या प्रसंगी सर्व श्री विजय होनगेकर गणेश दड्डिकर किशोर मराठे युवराज मलकाचे रोहन लंगरकांडे शिवाजी मेणसे विशाल गोंडाडकर उपस्थित होते
शाब्बास रे पठ्ठ्यानों.
हिच खरी महाराष्ट्र एकीकरण समीतीची संस्कृती.