महापौर संज्योत बांदेकर यांनी बेळगाव शहरासाठी 150 कोटी अतिरिक्त अनुदान देण्याची मागणी महापौर संज्योत बांदेकर यांनी केली आहे. अथणी येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असतेवेळी बेळगाव विमानतळा वर आले असता स्वागत करून महापौरांनी ही मागणी केली आहे.
प्रमुख नाल्यांचे पाणी शुद्धीकरण,गटार रस्ते निर्माण तसेच पिण्याचे पाणी समस्या सोडविण्यासाठी अतिरिक्त 150 कोटी अनुदान मंजूर करा अशी मागणी बांदेकर यांनी केली आहे.
महापौरांच्या मागणीचा विचार करू अस आश्वासन देत मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेलिकॉप्टर कडे गेले.
पुढचा सी एम मी तर राहुल पंतप्रधान
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी नंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री मीच होणार तर 2019 मधील लोकसभा निवडणुकी नंतर राहुल गांधी हे पंतप्रधान होतील असे मत सिद्धरामय्या यांनी मांडलं. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत मांडले.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी आगामी निवडणुकीत एकीने काम केल्यास जिल्ह्यातील 18 पैकी 12 जागा काँग्रेस का सहज मिळतील असा दावा देखील त्यांनी केला. गटबाजी ला थारा देणार नाही असं मत प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर यांनी व्यक्त केलं