भरधाव वेगाने जात असलेली इनोव्हा गाडीच नियंत्रण सुटल्याने डीवाईडर ला आदळून पलटी झाल्याने झालेल्या अपघातात 5 अभियांत्रिकी विध्यार्थी ठार झाल्याची घटना घडली आहे.
बेळगाव हुन चिकोडी कडे जाणारी इनोव्हाचा(ka 32 n 1154) अपघात रात्री दहाच्या सुमारास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काकती जवळील वंटमुरी घाटात हा अपघात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इनोव्हा गाडी इतक्या वेगात होती की पलटी झाल्याने चार जण जागीच तर एकाचा हॉस्पिटल ला नेताना वाटेत मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून डी सी पी अमरनाथ रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली.काकती पोलीस निरीक्षक रमेश गोकाक घटनास्थळी दाखल झाले होते.
आंबोलीहून परतते वेळी अपघात
के एल ई अभियांत्रिकी कॉलेज चिकोडी चे हे विध्यार्थी होते दोन दिवसांपूर्वी परीक्षा संपल्याने ते आंबोली ला फिरायला गेले असता वापस परततेवेळी वंटमुरी घाटात हा अपघात घडला आणि पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मृतकात सुशांत माने चांदुर चिकोडी,
संजीव कोंडीवगोळ विजापूर,
विवेक निशनदार चिकोडी,एजाज पठाण रायबाग तर वासुदेव पूजेरी येडुरवाडी चिकोडी हे सामील आहेत तर ओमकार आणि विवेक दोघे जखमी असून त्यांच्यावर के एल ई उपचार सुरू आहेत