सतत २० वर्ष विश्वसनीय आणि अचूक स्व देणार नोबल टेस्टिंग ही बेळगावातील महत्वाची संस्था आहे .नोबल टेस्टिंग ने केलेलं सोन्या चांदीच्या दागिन्यांच परीक्षण हे अतिशय योग्य असतंय हे वारंवार सिद्ध झालय अस मत दैवज्ञ सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश पावसकर यांनी व्यक्त केल . शनिवारी सायंकाळी भोज गल्ली शहापूर येथे नोबल टेस्टिंग च्या दालनाच उद्घाटन केल्या नंतर ते बोलत होते.यावेळी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रवीण रेवणकर वैभव वेर्णेकर अभिनंदन लेन्गडे ,प्रकाश मरगाळे आदि उपस्थित होते.
२१ देशात नोबल टेस्टिंग चा रिपोर्ट असेल तर कोणातही आक्षेप न घेता माल स्वीकारला जातो पार्सल वर नोबल टेस्टिंग चा रिपोर्ट असेल तर पार्सल न उघडताच मान्य केल जात एवढी विश्वासार्हता नोबल ने कमावली आहे असे उद्गारनिर्यातक सुरेश वेर्णेकर यांनी व्यक्त केला.
मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की समाज सेवे बरोबर व्यवसायाची सांगड घालत आपल व्यवसाय देखील गुणवंत पाटील यांनी सांभाळला आहे. समाजात सोने चांदीच आकर्षण आज देखील आहे शुद्ध सोने मिळवणे हा हक्क आहे परंतु सोन्या मध्ये अनेक धातू मिसळले जातात काही वेळा ठराविक धातू मिसळणे आवश्यक असते धातू मिसळलेली माहिती ग्राहकांना असणे गरजेचे आहे मात्र ग्राहकांची फसवणूक होऊ नये टेस्टिंग करण गरजेच आहे अस देखील दळवी म्हणाले. यावेळी नेताजी जाधव,नागेश सातेरी,प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, आर आय पाटील ,दीपक पावशे, एस एम बेलवटकर ,भागोजी पाटील , नारायण सावंत, साजिद सय्यद सुनील जाधव, आदींनी देखील नोबल टेस्टिंग यान शुभेच्छा दिल्या.