> आजच्या गतीमान जगात प्रत्येकजण धावतो आहे. पळा पळा कोण पुढे पळतो तो! अशी शर्यतच जणू चालू आहे. पुरुषांबरोबर स्त्रियांनाही अनेक जबाबदर्या पेलाव्या लागत आहेत. धावता धावता मग येतो तो अमर्याद थकवा आणि उदासिनता. भूक लागत नाही. झोप येत नाही, मन संशयी बनतं, उत्साह वाटत नाही, मग काय कराल?
> आशावादी रहा : प्रत्येक गोष्टीचा आशादायक विचार करा. रोजच्या कामाची क्रमवार यादी करा. आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत किंवा करायच्या आहेत त्या त्यांच्या महत्त्वाप्रमाणे नोंदवून ठेवा.
> आहार : पिष्टमय पदार्थांचा आहारात पुरेसा समावेश असावा लागतो. या पदार्थांमुळे रक्तातील सिरोटोनिनची पातळी व्यवस्थित राहते. झोप चांगली लागते. रोज एक सिट्रस फळ (लिंबू, संत्रे, मोसंबी इ.) आहारात असावे. शक्य असल्यास हिरवा पत्ती चहा घ्यावा. आहारात लोहाचे प्रमाण योग्य असावे.
> व्यायाम : अर्धा तास भरभर चालणे, ध्यान, योग, प्रार्थना या गोष्टी उदासिनतेवर मात करतात.
> संगीत : सुगम संगीत तसेच, काही वेळा फास्ट म्युझिक, तालबद्ध सुरावटी उत्साहाने भारुन टाकतात. काही खास रंग उदा. पिवळा, लाल, फिकट आकाशीदेखील उत्साही रंग मानले जातात. त्यांचा वापर करावा.
> उपचार : काही वेळा शरीरतील रक्ताचा लोहाचा अंश कमी झाल्याने थकवा आणि औदासिन्य येऊ शकते. थायरॉईड विकारांमुळे सुस्ती येणे, थकवा जाणविणे, चिडचिड होणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यासाठी योग्य त्या चाचण्या करुन घेणे आवश्यक आहे.
> निसर्गोपच्चार : डोळ्यांवर व माथ्यावर गुलाब पाण्याच्या घड्या ठेवाव्यात, समतोल आहार, भरपूर पाणी, मोकळ्या हवेत फिरणे उपयुक्त असते.
> ऍरोमाथेरपी : रोजवूड ऑईल २० थेंब, ऑरेंज ऑईल ५ थेंबर, जिरॅनियम ऑईल ५० मिली, तिळाचे तेल किंवा कॉर्न ऑईलमध्ये मिसळून बॉडी मसाजासाठी वापल्यास ताबडतोब उत्साही वाटते किंवा वर सांगितलेली ऑईल्स आंघोळीच्या पाण्यात मिसळावी.
> होमिओपॅथी : रक्त, हिमोग्लोबिन कमी होणे हे या विकाराचे मूळ कारण असते. त्याशिवाय होमिओपॅथिक उपचारांनी थकवा व औदासिन्य यावर मात करता येते.
>नॅट्रममूर : स्त्रियांमध्ये उद्भवलेल्या थकव्यावर, हाता पायातून पेटके येणे, कंबर दुखणे यावर गुणकारी
> पल्सेटिला : स्त्रियांमध्ये रक्त कमी झाल्याने आलेल्या थकव्यावर उपयुक्त.
> सोपिया, कॅक्लेरिया कार्ब : मासिक पाळीच्या अगोदर किंवा नंतरची कमजोरी यावर उपयुक्त
> पुष्पौषधी : अति काम करण्यामुळे आलेल्या थकव्यावर पुष्पौषधी उपयुक्त आहे.
> ऍक्युप्रेशर ऍक्युपंक्चर : ऍक्युप्रेशर पॉईंट्स बाबीस, अठ्ठावीस, सदुष्ट, एक्यांशीवर बोटाच्या टोकाने किंवा अक्युपंक्चर निडलने उत्तेजन दिल्याने थकवा नाहीसा होतो.
डाॅ.सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक ०८३१-२४३१३६४