आगामी एका वर्षाच्या आत बेळगाव साठी नवीन एफ एम रेडिओ स्टेशन सुरू करू अस ठोस आश्वासन माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड दिल आहे.
चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष फोरम च्या वतीनं राठोड यांना निवेदन देण्यात आलं त्यावेळी वरील आश्वासन दिलं आहे.
बेळगावात रेडिओ स्टेशन सुरू करा ही चेंबर फोरम ची जुनीच मागणी आहे.गेल्या तीन वर्षा पूर्वी बेळगाव मध्ये रेडिओ स्टेशन सुरू करण्याचे प्रयत्न झाले होते तांत्रिक अडचणी मूळ होऊ शकल नव्हतं. यावेळी चेंबर माजी अध्यक्ष सतीश तेंडुलकर, राजेंद्र हरकुनी, बसवराज जवळी, विकास कलगटगी आदी उपस्थित होते.
एफ एम रेडिओ स्टेशन मूळ युवकांना नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यामुळं साडे चार कोटी ऐवजी याची फी कमी करावी अशी मागणी चेंबर फोरम नी केली आहे.गोवा कोल्हापूर हुबळी भागात एफ एम असून मेट्रो सिटी तुन एफ एम चा वापर मूलभूत गरजांची माहिती साठी केला जातो त्यामुळं कन्नड मराठी कोकणी उर्दू अश्या प्रादेशिक भाषांतून एफ एम सेवा सुरू करण्यास अनुमती द्यावी अशी देखील मागणी चेंबर फोरम नी केली आहे.
आजच्या स्मार्ट फोन च्या युगात एफ एफ ला खूप महत्व आहे प्रत्येक स्मार्ट फोन मध्ये ही सुविधा आहे त्यामुळं बेळगावात एफ एम सुरू झाल्यास नवं नवीन रोजगार वाढतील याचा फायदा बेळगाव ला होईल अशी प्रतिक्रिया चेंबर फोरम चे सतीश तेंडुलकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे.
बेळगाव शहरातील बरेच रेडिओ इतिहास जमा झाले होते आजच्या सोशल मीडियाच्या जलद युगात मनोरंजनाचे साधन म्हणून रेडिओ उपयुक्त आहे.धारवाड हुबळी आणि कोल्हापूर येथे एफ एम रेडिओ यशस्वी रित्या सुरू असताना बेळगावात नवीन रेडिओ स्टेशन सुरू होण काळाची गरज आहे असही ते म्हणाले.