मिरगाचा म्हणून ओळखला जाणारा आणि शेतकऱ्यांचा खरा आधार ठरणारा मृग नक्षत्राचा पाऊस आलाच नाही.खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच दिलेल्या पावसाच्या या दडीने शेतकरी वर्गाला हुडहुडी आणली आहे. पाऊस कधी येणार या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे.
पाऊस हा शेतीला पोषक ठरणारा पहिला आधारस्तंभ, तोच नसेल तर कायच चालत नाही. पाऊस येणार म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसण्या शिवाय शेतकऱ्यांच्या हातात कायच शिल्लक नाही.
यंदा पाऊस जोरदार बरसणार हा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, मात्र पहिल्याच नक्षत्रात हात दिल्याने आता पुढचे काय ही चिंता शेतकऱ्यांना आहे.