खानापूर तालूकाच नव्हे तर सबंध मराठी सीमाभागातील मराठी जनतेच्या आणि महाराष्ट्रातील आजी माजी नेत्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे माजी अध्यक्ष तर 1983 साली कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मते घेऊन खानापूर तसेच सीमाभागातील मराठी जनतेला मान मिळवून देणारे आमदार आदरणीय कै वसंतराव पाटील. खानापूर मतदार संघातून दोन वेळा आमदारकी भुषवली होती.
त्यांचे गेल्या वर्षी दुखःद निधन झाले त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले.त्यानिमीत्त त्यांचे मुळ गाव गर्लगुंजी येथे त्यांचे कुटूंबीय तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीती,सर्व घटक समीती अध्यक्ष तसेच सर्व पदाधीकारी,,खानापूरचे आमदार मा.अरविंद पाटील, जिल्हा पंचायत,ता पं,ग्राम पं,अध्यक्ष सर्व पदाधीकारी,
परिसरातील सर्व जेष्ठ आणी श्रेष्ठ मंडळी त्याचबरोबर त्यांचे हितचिंतक,पाहूणे मंडळी व सर्व शाळेतील विद्यार्थी,शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत.मराठी शाळेत प्रथम स्मृतीदिन पार पडला.
सर्वप्रथम आ कै वसंतराव पाटील यांच्या स्मृतीचे पुजन मध्यवर्ती समीती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, खानापूरचे आमदार मा अरविंद पाटील,माजी आमदार मनोहर किणेकर,सरचिटणीस मालोजी अष्टेकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवलन झाले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनता हजर होती. व्यासपिठावरील नेत्यांनी आ कै वसंतरावांचे सीमाप्रश्नी योगदान आणी त्यांच्या कार्याचा जीवनपट उलगडतानां अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ दिगंबर पाटील यांनी तर संपूर्ण भाषण डोळ्यातून घळघळ अश्रू आणतच केल्याने जमलेले सर्वजण शोकाकूल झाले.आणी तेवढ्या मोठ्या गुणाचे नेतेही आ कै वसंतराव होते हे कोणीही नाकारु शकत नाहीत.त्यांचा शांत,सर्वाशी संयमान वागत बोलणे यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्या मोहात पडायची म्हणूनच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीच गेली पंचवीस वर्षे ते अध्यक्ष होते. सीमाप्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी हरतर्हेने त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.आ माजी केंद्रीय मंत्री नेते शरदरावजी पवार,आ एन डी पाटील, शिवसेनाप्रमूख आ कै बाळासाहेब ठाकरे,एस एम जोशी,ना ग गोरे,इतर जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै विलासरावजी देशमुख,माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आ कै आर आर पाटील व महाराष्ट्रातील इतर नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबध होते ते त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे.या सर्व नेत्यांसमोर ते सतत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सोडवून सीमाभागातील भोळ्याभाबड्या मराठी जनतेला गेल्या 1956 पासून आजपर्यंत कर्नाटकी अन्याय अत्याचार सोसणार्या जनतेला महाराष्ट्रात सामील करावं म्हणून आपली हयातभर प्रामाणिकपणे प्रयत्न केले ते न विसरण्यासारखे आहेत. तेंव्हा अशा सीमाप्रश्नी आपले जीवन समर्पित केलेल्या आदरणीय कैलासवासी मा वसंतरावजी पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनी बेळगाव live तर्फे विनम्र विनम्र अभिवादन.
Jay Maharashtr Garlgunji