महिला आघाडी को.ऑप.सोसायटीच्या माध्यमातून E STAMP चे उदघाटन गुरुवारी 22 रोजी महापौर संज्योत बांदेकर यांच्या शुभहस्ते झाले.
स्वागत सोसायटीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केले.
गणपत गल्लीतील महिला आघाडी को.ऑप.सोसायटीच्या माध्यमातून व्यापारी वर्गाची सोय व्हावी म्हणून माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी आपल्या सोसायटीत E STAMP ची सोय केली आहे.
यावेळी महापौर संज्योत बांदेकर यांनी रेणू किल्लेकर यांच्या या उपक्रमाबद्दल गौरोउदगार काढले,
यावेळी माजी महापौर सरिता पाटील, दीपा कुडची, अनुपमा कोकणे आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बातमी सौजन्य- महादेव पाटील