गेल्या 4 जून रोजी बेळगाव तालुक्यातील धामणे गावात घरा समोर आणि शेतात दुचाकी ,चार चाकी आणि ट्रॅकर जाळलेल्या घटनेस होऊन 15 दिवस उलटले तरी आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे या घटनेचा छडा लावून आरोपींना गजाआड करा अशी मागणी धामणे ग्रामस्थ आणि समिती नेत्यांनी केली आहे.
मंगळवारी समिती आणि धामणे येथील शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त जी राधिका यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे.या घटनेत 3 दुचाकी 4 कार, 40 पोति भात ट्रॅक्टर जळून लाखो रुपयांचं नुकसान झाल आहे या परिवाराना नुकसान भरपाई ध्यावी अशी मागणी करण्यात आली आहे
Trending Now