रमजान सणा निमित्य उडुपीच्या श्रीकृष्ण मठाचे पेजावर श्री स्वामी यांना विरोध करणाऱ्या प्रमोद मुतालिक यांना हद्दपार करण्याची मागणी के पी सी सी सदस्य दीपक चिंचोरे यांनी केली आहे.
धारवाड जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत त्यांनी ही मागणी केली आहे.
पेजावर स्वामी यांनी रमजान महिन्यात पेजावर मठात जातीय धार्मिक सलोखा राखण्यासाठी रोजा उपवास ठेवलेल्या मुस्लीम बांधवांसाठी इफितीयार चे आयोजन केले होते याचा विरोध करत मुतालिक यांनी मठात मुस्लिमांच्या आगमनाने मठ अशुद्ध झालं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं असा आरोप के पी सी सी सदस्य दीपक चिंचोरे यांनी केला आहे. मुतालिक यांच्या वक्तव्याने दोन धर्मीयांत तेढ निर्माण झाला आहे असेही चिंचोरे म्हणाले.
उडुपी पेजावर मठाच्या स्वामींचा विरोध करणाऱ्या मुतालिक यांचा विरोध करत पेजावर स्वामी ना पाठिंबा काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.