कर्नाटकी पित्त खवळले, बेळगावात जय महाराष्ट्र वर पून्हा गुन्हे

0
1250
st-new-logo
 belgaum

महाराष्ट्र परिवाहन मंडळाची जय महाराष्ट्र लिहिलेल्या बसच स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकासह बस चालक आणि वाहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र एस टी च स्वागत केलेल्या मराठी भाषिकावर गुन्हे घालून पोलिसांनी दडपशाही चालूच ठेवली आहे.शुक्रवारी रात्री बेळगाव बस स्थानकावर पहिल्यांदाच आगमन झालं होतं यावेळी समिती कार्यकर्त्यांनी बसचे स्वागत करत बस चालक आणि वाचकांचा देखील भगवा फेटा बांधून स्वागत केलं होतं. मार्केट पोलिसांनी 153 अ दोन भाषिकात तेढ निर्माण करणे ,143,147 आणि 149 असे गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांनी सातारा बस कर्मचारी प्रमोद गायकवाड,देविदास मोरटे, समिती कार्यकर्ते मदन बामणे, अड अमर येळ्ळूरकर,सूरज कणबरकर,गणेश दड्डीकर,मेघन लंगरकांडे सह अन्य 15 जणांवर हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

गेल्या 25 मे रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात आले असतानाची बातमी ताजी असताना बस च स्वागत करणाऱ्या वर पोलिसांनी गुन्हे दाखल करून बेळगावात कानडी दंडेली सुरूच आहे हा प्रत्यय दिला आहेMsrtc bus driverBgm st

 

 belgaum

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.