नार्वेकर गल्लीत शहापूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हणमंत
मजुकर यांच्या मालकीची इमारत महा पालिकेच्या अधिकाऱ्यानी सीज केली आहे.
शुक्रवारी दुपारी पालिका दक्षिण विभागाच्या अभियंत्या लक्ष्मी निप्पणीकर आणि अतिक्रमण विरोधी पथकाने सदर इमारतीस टाळ ठोकलं आहे.
महा पालिका आणि मजुकर यांच्यात इमारत पाच मजली बांधण्यावरून वाद सुरू आहे मात्र पालिकेत केस सुरू असताना देखील इमारतीच काम सुरू ठेवल्याने टाळ ठोकलं आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अतिक्रमण हटाव विभागाने शिवसेने च्या या मराठी नेत्याच्या इमारतीस टाळ ठोकलं बेधडक कारवाई केली हेच कारवाई च धाडस त्यांना आमदाराच्या शिक्षण संस्थेच्या बेकायदेशिर शेड हटवताना दाखवता आले नाही का?पालिकेचे अधिकारी तोंड बघून कारवाई करतात का अशी चर्चा सध्या सुरू आहे.




