Sunday, January 26, 2025

/

स्तनांचे कॅन्सर-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobat
स्तनांमध्ये निर्माण होणार्या गाठी दोन प्रकारच्या असतात.
1 फायब्रोऍडिनोमा – दुखणार्या गाठी, या साध्या असतात.
2 न दुखणार्या कॅन्सरच्या गाठी की, ज्या उग्र रूप धारण करून कॅन्सरचे थैमान घडवून आणतात.
3 अशा प्रकारचे कॅन्सर स्त्रियांमध्ये पुरूषांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असतात.
4 यापाठीमागे कौटुंबिक इतिहास सापडतो. आई किंवा बहिण या रोगाला बळी पडल्याचा इतिहास सापडतो. असा इतिहास असणार्या घरातील स्त्रियांनी वरचेवर तपासणी करून घेतली पाहिजे.
5 कोणत्याही वयात मासिक पाळी आल्यापासून मासिक पाळी बंद झालेल्या काळातही अशा केसेस आढळतात.
6 ५० ते ५५ वर्ष वयामध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.
7 पाश्चात्य देशात याचे प्रमाण जास्त आढळते.
8 मासिक पाळीशी निगडीत यांचे प्रमाण जास्त आढळून येते.
9 प्रिकॉशिअस प्यूबर्टी – वयाच्या ९ ते १० वर्षाच्या आत मासिक पाळी येणार्या केसेसमध्ये डर्माईड सिस्ट नावाच्या गाठी स्त्रीबीज कोषात आढळतात व या गाठींमध्ये केस, दात, काही थायरॉईड ग्रंथीच्या पेशी, रक्त व काही तंतुमय पेशी, रक्त व काही तंतुमय पेशी आणि इतर घटकही आढळतात. वयाच्या २० ते ३० या काळात जरी या गाठी कॅन्सरयुक्त नसल्यातरी त्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो व हे प्रमाण १.७ टक्के असते. म्हणून सोनोग्राफीने निदान झाल्यास लगेच त्याचे दुर्बिणीद्वारे उच्चाटन करणे किंवा काढून टाकणे जरूरीचे असते.
10 मासिक पाळी असताना म्हणजे तरूण वयातील स्तनांचे कॅन्सरचे स्वरूप गंभीर असतात, तर मासिक पाळी गेल्यानंतरचे होणारे कॅन्सर ऑपरेशन, शेक देऊन, किमोथेरपीने नीट करता येतात. याचा अर्थ स्तनांचे कॅन्सर हार्मोनशी निगडित असतात.
कॅन्सर गाठींच्या स्टेजेस/टप्पे
पहिली स्टेज: हाताला तपासणीत गाठी शक्यतो कमी लागतात किंवा काही वेळेला लागतही नाहीत.
दुसरी स्टेज: तपासणीला गाठी हाताला लागतात. पण काखेतील रसग्रंथी तपासणीत हाताला लागत नाहीत. त्याचप्रमाणे त्या गाठीचा आकार पाच मि.मि. पेक्षा कमी असतात. या गाठी वेदनाविरहित असतात. कँपमधून अथवा तपासणीमधून यांचे निदान ६६ टक्के होऊ शकते.
तिसरी स्टेज: यामधील गाठी पाच मि.मि. पेक्षा जास्त मोठ्या असतात. तपासणीत त्या त्वचेला किंवा छातीवरील बरगड्यामधील स्नायूंना चिकटलेल्या नसतात. मानेमधील रसग्रंथी म्हणजे मानेच्या हाडावरील रसग्रंथीमध्ये कॅन्सरचे जंतु पसरलेले आढळू शकतात. या स्टेजमध्ये कँपमधून अथवा तपासणीतून ४१ टक्के निदान होत असते. या गाठी मोकळ्या असल्याचे तपासणीत आढळून येतात.
चौथी स्टेज: खूप दूरवर कॅन्सर पसरलेले असतो. या गाठी छातीच्या स्नायूंना अथवा त्वचेला किंवा दोन्हीकडे चिकटलेल्या अवस्थेत तपासणीत आढळून येतात. काखेतील व मानेतील रसग्रंथीना प्रादुर्भाव झाल्याने त्या ठिकाणच्या रसग्रंथींना प्रादुर्भाव झाल्याने त्या ठिकाणच्या रसग्रंथी हाताला तपासणीत कळून येतात. त्याचप्रमाणे स्तनचुचुके आत ओढलेले, तर काही केसेसमधोन व्रणीत झालेले आढळतात. ही गंभीर गोष्ट असल्याने अशा केसेसचे निदानाचे प्रमाण १० टक्के असू शकते. एंकदरीत पाहता सर्वच कॅन्सरपेशींचे स्टेजनुसार व लक्षणानुसार आयुमर्यादेचा आलेख आढळतो.
स्व:तच स्तनाची तपासणी करावी.
याला Self Examination असे म्हणतात. लवकर निदान झाल्यास या दुर्धर रोगाने बळी पडणार्यांची संख्या नक्कीच कमी होऊ शकेल. आरशामध्ये बघुन तपासाणीत गाठी आहेत का ते तपासावे.

तसेच आंघोळीचे, शॉवरचे पाणी त्वचेवर पडल्यास ओल्या कातडीवरील गुल्म हातांना चांगलेच कळुन येतात. या गाठींचा स्पर्श प्रभावीपणे हाताला खुपसे काही सांगुन जातो. कॅम्पमधुन अशा गोष्टी कळल्याने एक हजार तपासणीमध्ये अंदाजे ६ हजार केसेस आढळुन येतात. अशा प्रकारची तपासणी केव्हा करावी?
1 मासीक पाळीच्या कालावधीत.
2 मासीक पाळी संपल्यावर मध्यवती कालवधीत.
3 मासीक पाळ&0020;याचे स्वरुप समजुन येवु शकते. कारण फायब्रोऍडीनोमा हार्मोन्सच्या पातळीवर कार्यरत राहतात.
4
5 मेमोग्राफी: या प्रकाराची तपासणी अंत्यत महत्वाची समजली जाते. या तपासणीमुळे ४० टक्के केसेसमध&##x0940; होण्यापुर्वी.
बर्याचवेळेला या गाठीचे हार्मोन्समुळे जे स्वरुप असते ते कळुन आल्याने हार्मोनल चिकित्सेला वाव मिळतो व त्याचप्रमाणे कॅन्सर फायब्रोऍडीनोमा साधा आहे का कार्सिनोजनीक आहे,ये कॅन्सरची गाठ होण्यापुर्वी निदान होऊ शकते. ही तपासणी म्हणजे कमी रेडिएशनचे एक्स-रे आणि एक्स-रे सारखे फिल्म घेतले जाणे होय. त्यामध्ये स्तननलिका (सुक्ष्मसुध्दा) मधील आवरणात घडणारा बदल दिसुन येतो. कारण स्तनाच्या कॅन्सरची निर्मिती नेहमी स्तनवाहिन्यांच्या आतील पेशींपासुन होत असते व दुसरे स्तन्य निर्माण करणार्या पेशीमध्ये होत असते. यांना Tubular Origin of Cancer व Lobular Origin of Cancer असे म्हटले जाते. ही मॅमोग्राफी Ordinary व Xeromemography या प्रकारे ओळखली जात असुन या Xeromemogrphy मध्ये खोटे रिपोटर्स ही False निगेटिव्ह येऊ शकते. त्यावेळी त्याची खात्री करुन घेण्यास फ़ाईन निडल ऍस्पिरेशन टेस्ट किंवा बायॅप्सी करुन खर्या निदानापर्यंत पोहोचता येते.

सुक्ष्म सुईच्या साहाय्याने सिंरीजमध्ये स्त्राव ओढुन घेऊन तो स्त्राव स्लाईडवर पसरवुन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने निदान केले जाते. त्याला फाईन नीडल ऍस्पिरेशन टेस्ट असे म्हणतात. यामध्ये ४० टक्के निदान होऊ शकते.

 belgaum

तुकडा तपासणी – जर स्तनातील गाठी हाताला लागत असतील तर एखादी गाठ काढुन १० टक्के फ़ॉर्मलीनमध्ये ठेवुन त्याचे बारीक छेद घेऊन मायक्रोस्कोपखाली तपासणी करुन अहवाल दिला जातो. यामध्ये ३५ टक्के कॅन्सरचे निदान होताना आढळुन येते.
चिकीत्सा
1 ऑपरेशन: रसग्रंथी रसवाहिन्यांसह संपुर्ण स्तन काढुन टाकणे याला Radical Mastectomy असे म्हणतात.
2 हार्मोनल
3 अ) प्रायमरी हार्मोनल थेरपी:
4 ब) दुय्यम हार्मोनल थेरपी: यामध्ये काही अंशी औषधे वापरतात की, पायुषग्रंथी, मुत्रपिंडावरील सुप्रारिनल ग्रंथी व स्त्रीबीज कोषामधुन स्त्रवणार्या हार्मोन्सच्या प्रभावाखाली होणारया ट्युमर्समध्ये प्रतिसाद चांगला मिळतो.
5 शेक देणे: तंज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिले जातात.
6 किमोथेरपी: काही कॅन्सर जंतुनाशक औषधांचा वापर तझांच्या सल्ल्यानुसार.
7 मानसिक शांतीसाठी:
8 अ. संगीत ऎकविणे, भक्तीसंगीत, प्रवचन जेणे करुन पेशंटचे मन रोगचिंतनापासुन दुर ठेवणे.
9 ब. टीव्ही माध्यम
10 क. आध्यमिक प्रबोधन
ही शेवटची चिकित्सा अतिगंभीर व दुर्धर रोग्यांना की ज्यांचे प्राण वाचवणे आवश्यक होते तेव्हा दिली जाते.
होमिओपॅथी
पहिल्या स्टेज मधे उपयोग नक्कीच होतो.
वारंवार तपासणी करणे गरजेचे असते

डाॅ.सोनाली सरनोबत

केदार क्लिनिक ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक ०८३१-२४३१३६४

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.