कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील याचिकेत लवकरात लवकर पुढची तारीख घ्या अजिबात वेळ घालवू नका जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र आणि इतर काम पूर्ण करा असा आदेश महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी दिले आहे .
गुरुवारी दुपारी बेळगाव सीमा प्रश्नी तज्ञ समितीची मंत्रालयात बैठक झाली या बैठकिच अध्यक्ष स्थान सुमित मलिक होते. बैठकीस वकील शिवाजी राव जाधव, जेष्ठ नेते एन डी पाटील, सीमा कक्ष अधिकारी ,दिनेश ओउळकर आणि समितीचे नेते उपस्थित होते. आगामी ७ जुलै ते १४ जुलै पर्यंत सीमा खटल्याच्या जुनियर आणि सिनियर वकिलांची बैठक बोलवा आणि पुढील तारीख घेण्यसाठी त्वरित पुढची पावल उचलू असा देखील ठरवण्यात आल.
जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे आगामी १६ जुलै परदेशातून येणार आहेत त्यामुळे त्यांची भेट घेऊन लवकर खटल्याची पुढील तारीख घ्या अशी सूचना सीमा कक्ष अधिकाऱ्यांनी वकील शिवाजी राव जाधव यांना दिली आहे. यावेळी सीमा कक्ष अधिकारी अप्पर सचिव भोसले, आमदार अरविंद पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी मनोहर किणेकर दिगंबर पाटील निन्गोजी हुद्दार जयराम मिरजकर पृथ्वीराज पाटील रामराव राठोड सुनील आनंदाचे आदी हजर होते.