यु पी एस सी असो किंवा आयुष्यातील परीक्षा असो तेथे पुस्तकीय ज्ञानापेक्षा पुस्तका बाहेरचे ज्ञान महत्वाचे आहे. जो पर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोवर हा देश पुढं जाणार नाही त्यासाठी सर्वसामान्यांचा मुलगा अधिकारी पदावर बसला पाहिजे असं मत बेळगावचा पहिला यु पी एस सी उत्तीर्ण झालेला, सीमा शुल्क उपायुक्त आकाश चौगुले यांनी व्यक्त केलं.
युनिक अकादमी पुणे आणि ज्योती करियर अकादमी गुणवतांचा गौरव अनुभव कथाकथन असा संयुक्त कार्यक्रम गोगटे रंग मंदिरात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी युनिक अकादमी पुणे तुकाराम पाटील उपास्थित होते.
नुकताच यु पी एस सी आय ए एस उत्तीर्ण झालेल्या वेंकटेश धोत्रे चा आकाश चौगुले तर पुणे आय आर एस चा तुषार घोरपडे चा सत्कार राजाभाऊ पाटील यांनी केला.युनिक अकादमी यु पी एस सी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ने 2 वरून 35 वाफ मजल मारली अशी माहिती युनिक अकादमी बेळगाव चे राजकुमार पाटील यांनी दिली.
12 लाखा पैकी केवळ वॅकनसी नुसार 3000 जण यु पी एस सी त निवडले जातात त्यात केवळ 250 आय ए एस बनतात बाकीच्या ना इतर क्षेत्रात संधी मिळते केल्या शिवाय मिळत नाही केलेले कार्य व्यर्थ जात नाही त्यामुळे यशस्वी बनण्यासाठी कायम कार्यरत राहा असा सल्ला नूतन आय ए एस वेंकटेश धोत्रे यांनी दिला यावेळी आय आर एस तुषार घोरपडे याने देखील आपलं मनोगत व्यक्त केलं.यावेळी शेकडो विध्यार्थी अन्य उपास्थित होते