बेळगाव शहराला भूकंपाचा सौम्य धक्काशनिवारी रात्री बेळगाव शहर आणि परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.
रात्री ११ वाजून 45 मिनिटांनी काहीप्रमाणात पृथ्वी हलत असल्याचा अनुभव नागरिकांना आला आहे.जवळपास तीन ते चार सेकंद भूकम्प झाला असल्याची माहिती मिळत असून रिसचर स्केल किती स्वरूपाचा आहे याची माहिती मिळाली नाही.
वडगाव भागातील ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर हे आपल्या घरच्या टेरेस वर बसले असता खाली ठेवलेली खुर्ची आपोआप हलली इतक्या सौम्य स्वरूपचा हा धक्का होता.
सांगली जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती हाती आली आहे. बेळगावात वडगाव, शहापूर, अनगोळ, टिळकवाडी या भागात भूकंप झाल्याची चर्चा आहे. अनेकांनी बेळगाव live शी याबद्दल सम्पर्क साधून माहिती दिली.
कोल्हापुर मध्ये वीस सेकंद जाणवला लोक घाबरून घराबाहेर आले. दारे, खिडक्यांची तावदाणे यांचा जोरात आवाज झाला, पत्रे असलेल्या छतातून मोठा आवाज होत होता त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर आले सुमारे दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भुकंपाची तीव्रता किमान 3 ते 4 असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
या भूकंपाचे मुख्य केंद्र कोयना धरण असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ४.८ magnitude असलेला हा भूकंप नेमका कसा झाला आणि त्याचा विस्तार नेमका कुठवर याची माहिती स्पष्ट नाही.
भूगर्भ शास्त्राच्या अभ्यासकांच्या माहिती नंतर सारेकाही स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्यातरी कोणत्याही हानीची माहिती नाही.
Even this happends also in virbhadranagar belgaum at night 11.45 for a 2 second i feeled it when i gone to sleep