केंद्र सरकार गुणात्मक कामे करत आहे, देशात बदलाचे वारे वाहत आहेत,देशाची स्थिती बदलली असून सर्वत्र पारदर्शकता आली आहे. देशाचे माहिती व प्रसार खात्याचे राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड बोलत होते.
प्राचीन काळापासून भारताचे महत्व मोठे आहे, तेच सामर्थ्य आजही आहे. सामर्थ्याच्या जोरावर उत्तम प्रशासन हवे असते, ते समाजस्वास्थ्याच्या रूपाने मिळवून देण्याचा प्रयत्न केंद्र करत आहे,माझं आणि आमचं ही भावना प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये यायला पाहिजे, तरच चांगले प्रशासन येईल. मोदी सरकारच्या काळात जनतेला चांगली भावना येत आहे.
स्मार्ट सिटी बद्दल डॉ सोनाली सरनोबत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांनी केले. बेळगावात झालेल्या बुद्धिजीवींच्या सम्मेलनास ते आले होते.
भारतीय सैन्याला आता युद्धाच्या आदेशाची गरज नाही. पाकिस्तानने उद्धटपणा केल्यास आवश्यक कारवाईचे स्वातंत्र्य सैन्याला आहे.