मनात आणले की काहीही झाले तरी पूर्ण करून दाखवायचे हा बेळगाववासीयांचा मूळ स्वभावच आहे. हाच स्वभाव दाखवत जिद्दीने बेळगावच्या एक दाम्पत्याने १०० किंवा २०० नव्हे तर ६००० किमी चा मोटोरसायकल प्रवास केला आहे. त्यांचा हा थरारक प्रवास बुधवारी पूर्ण होणार आहे.जितेंद्र आणि अपर्णा भिडे अशी त्यांची नावे आहेत. आपल्या बजाज avenger वरून ते बेळगाव वरून भूतान ला जाऊन परतत आहेत.
बुधवारी सायंकाळी ४ वाजता हिंडलगा येथील गणपती मंदिराकडे ते दाखल होणार आहेत. त्यांच्या चाहत्यांकडून आणि मित्र मैत्रिणींकडून त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे.
Trending Now