देशाला स्वातंत्र मिळावे म्हणून ब्रिटीश सत्तेविरोधात बंड केल्यामुळे थोर स्वातंत्र सेनानी स्व.बाबासाहेब नरगुंदकर यांना १२ जून १८५८ साली फाशी देण्यात आली, त्याचा १५९ व्या स्मृतिदिनी त्याना त्यांच्या समाधीला महापौर पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, त्याचबरोबर जेष्ठ स्वातंत्र सैनिक विठ्ठलराव याळगी, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, राजेंद्र कलघटगी, यांच्या हस्ते ही पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत परशुराभाऊ नंदीहळ्ळी यांनी केले, स्व. बाबासाहेब नरगुंदकर यांची संपूर्ण माहिती विठ्ठलराव याळगी यांनी दिली, महापौर संज्योत बांदेकर, अशोक पोतदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वातंत्र सैनिक संघटना, जायंट्स मेन, कुस्तीगिर संघटना, मराठी पत्रकार संघ, बेळगाव मार्ग, निर्झरानंद सर्प व वृक्ष संवर्धन संघ यांचे पदाधिकारी सर्वश्री उमेश पाटील, मदन बामणे, मोहन कारेकर, अरुण काळे, अशोक पोतदार, मारुती घाडी, निर्झरा चिट्टी, आनंद चिट्टी,विजयराव शहा, जवाहर देसाई, नगरसेविका माया कडोलकर, दिलीप सोहनी, आर के कुट्रे, हिरालाल चव्हाण, उपस्थित होते,
महादेव पाटील यांनी सूत्रसंचलन केले.
Trending Now