समिती कार्यकर्ते आणि नेत्यावर कर्नाटक पोलिसाकडून होणारे अन्याय खोटे गुन्हे आणि दडपशाही च्या तसेच भाषिक अल्पसंख्याक अधिकार मिळावेत यासाठी महाराष्ट्र विधी मंडळाच्या अधिवेशनात मुंबई मुक्कामी एक दिवस धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला .
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. प्रारंभी मुतगा येथील कट्टर समितीचे कार्यकर्ते सीमा प्रश्नासाठी शपथ घेत ३५ वर्ष अनवाणी चाललेले महावीर पुजेरी यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय पक्षा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत समितीने देखील लढ्याचा एक भाग म्हणून मतदार याद्या नाव नोंदणी अभियान कराव तसच १४ जून रोजी मुंबईत तज्ञ समिती बैठक झाली तर जय महाराष्ट्र वरून पोलिसी अत्याचार सह मागील बैठीकीतील उरलेले विषय मांडावे अशी सूचना खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी मांडली . दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवाल महाराष्ट्रातील खासदारांना सादर करून याची अंमल बजावणी करण्याची मागणी करू असही मरगाळे म्हणाले .
कोर्टाच कामकाजाचा आढावा
वकील राजाभाऊ पाटील यांनी बैठकीत एकंदरीत कोर्टाच्या कामकाजाचा आढावा देत महाराष्ट्राच्या बाजूची चारही प्रतीज्ञा पत्र तयार असून लवकरच तज्ञ समिती बैठकीत त्याच्येवर अंतिम निर्णय घेऊन पुढील तारखेत ती सादर करण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी मालोजी अष्टेकर सह अन्य मध्यवर्ती सदस्य उपस्थित होते
खूप छान. कळाची गरज.