बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशान भूमीतील शेडावरचे पत्रे कधी दूरस्त होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाऊस सुरू झाल्याने पत्र्यातील गळती मूळ लोकाना त्रास सहन करावा लागत आहे. माजी महापौर सरिता पाटील यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून पत्रे दुरुस्ती करा असा आदेश दिला होता तरी देखील महा पालिका अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. विध्यमान महापौर संज्योत बांदेकर यांनी देखील शेड दुरुस्ती साठी प्रयत्न चालविले आहेत मात्र पालिकेने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं आहे .
पावसात अंतिम संस्कारावेळी पत्रे गळती झाल्यानं याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेड दुरुस्ती साठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
बातमी सौजन्य-अरविंद कडुकर