मुतगा गावातील ज्येष्ठ सीमासत्याग्रही महावीर पुजेरी वय 76 राहणार मारुती गल्ली मुतगा यांचे शुक्रवारी निधन झाले .
त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा व एक मुलगी आहे
सीमाप्रश्न सुटल्याशिवाय पाया मध्ये चप्पल घालणार नाही असा त्यांनी पण केला होता.
पूर्व भागातील महाराष्ट्र एकीकरण समीतिचे ते कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित होते.
ते जैन समाजाचे पुजारी होते आणि गावातील सर्व मंदिरांची पूजा करत होते. 1978 साली मुंबई मुक्कामी माजी आमदार कै जी एल अष्टेकर पहिल्यांदा आमदार झाले तेंव्हा आंदोलन केलं होतं अनेकदा सीमासत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पण ते कधीही डगमगले नाहीत.वयाच्या 36 व्या वर्षी त्यांनी पायात चप्पल घालायची बंद केली.तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत ते कोठेही गेले तरी अनवाणीच फिरले. अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला सीमावासीयांची आणि बेळगाव live ची भावपूर्ण आदरांजली….