बेळगाव शहरात अनेक खाजगी शाळांतून एकाच दुकानात युनिफॉर्म खरेदी सक्ती करत शाळा प्रशासन आणि बी ई ओ मनमानी करत आहेत केवळ कमीशन साठी खाजगी हा व्यवसाय सुरू आहे असा आरोप करत शाळांची मनमानी रद्द करा या मागणी साठी भ्रष्टाचार निर्मुलन परिवार तर्फे निवेदन देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन खाजगी शाळांची मनमानी बंद करा अशी मागणी करण्यात आली.
शाळा प्रशासन आणि काही कापड दुकान दारांनी कमिशन साठी किंमती पेक्षा अधिक पैसे पालकां कडून उकळायला सुरू केलं असून यात सरकारी अधिकारी देखील सहभागी आहेत असा आरोप देखील करण्यात आला आहे यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन परिवार चे प्रमोदा हजारे, साजिद सय्यद, संतोष कांबळे,संजय पाटील संतोष जंतीकट्टी ,नागापा लाड आदी उपस्थित होते