बेळगावात जय महाराष्ट्र फिव्हर , युवकान हातावर गोंदवले२५ मे गुरुवारी मराठी परी पत्रकासाठी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर बेळगावात जय महाराष्ट्र फिव्हर सुरु झाला आहे. सोशल मिडिया असोत किंवा कट्ट्यावरील चौका चौकातील चर्चात असोत सगळीकडे जय महाराष्ट्र या विषयाचीच चर्चा रंगू लागली आहे .आपल्या दुचाकीवर जय महाराष्ट्र लिहिण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे.
वास्तविक पाहता नगर विकास मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्या नंतर सामान्य मराठी भाषिक कार्यकर्ते असोत किंवा लोक प्रतिनिधी असोत सगळे जन जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी पुढं सरसावले आहेत .
आपल्या हातावर देवाच नाव किंवा आई वडील बायकोच नाव अनेक जन लिहून घेत असतात गोंदवत असतात मात्र बेळगावात असे अनेक युवक आहेत ज्यांनी हातावर जय महाराष्ट्र गोंदवून घेतल आहे .मुतगा येथील सुधीर सय्याजी पाटील या २७ वर्षीय एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याने हातात जय महाराष्ट्र म्हणून गोंदवून घेतलय. सुधीर ने वयाच्या चौदाव्या वर्षी हातावर जय महाराष्ट्र अस लिहित गोंदवल आहे . समितीच्या कुठल्याही कार्यात अग्रभागी असणाऱ्या सुधीर याने गुरुवारच्या मोर्चा साठी खास तयारी केली आहे. सुधीर सारखे अनेक युवक आहेत कि ज्यांच्या मनात मनात जय महाराष्ट्र आहे तर काहींनी हातावर तर काहींनी आपल्या दुचाकी वर जय महाराष्ट्र लिहील आहे .