Thursday, March 28, 2024

/

म्हणे समितीवर बंदी घाला, वाटाळ ची वटवट

 belgaum

Watal nagrajलोकशाही मार्गातून गेली 60 वर्षं लढत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला पुन्हा एकदा कन्नड संघटनांनी डीवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.मूठभर बेळगाव बाहेरील कन्नड कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वाटाळ नागराज यांनी समिती वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.बुधवारी सकाळी प्रचंड पोलिसांच्या गराड्यात मूठभर कार्यकर्त्या सह वाटाळ नागराज कन्नड वेदिकेचे राज्य अध्यक्ष प्रवीण कुमार शेट्टी यांनी धिंगाणा घातला.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालून समिती कार्यकर्त्यांना तडीपार करण्याच्या मागणीसाठी येत्या 12 जूनला कर्नाटक बंदची हाक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठीची मागणी करणाऱ्याना आणि कन्नड न येणाऱ्याना येथून हाकलून लावा, अशी अनाठायी मागणीही केली आहे.
केवळ मूठभर कार्यकर्ते आणि 200 पेक्षा अधिक पोलिसांचे कवच घेऊन दाखल झालेल्या वाटाळ नागराज आणि कन्नड कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.