बेळगाव शहर ट्राफिक दिवसेंदिवस हायटेक होताना दिसत आहेत ट्राफिक नियंत्रणासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 23 टॉवर उभे करून अनेक चौकात 90 कॅमेरे बसवून ट्राफिक मॅनेजमेंट केलं जाणार आहे. या सर्व कॅमेऱ्यावरील दृश्ये एकाच रूम मध्ये बघून शहरातील ट्राफिक मॅनेजमेंट केलं जाणार आहे. नियंत्रण कक्ष तयार झाला असून बेळगाव पोलीस हायटेक तंत्रज्ञान वापर करणार आहेत.
कॅम्प ट्राफिक दक्षिण पोलीस स्थानकात हा नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून 23 टॉवर आणि 90 कॅमेऱ्याची दृश्ये एकाच रूम मध्ये पाहून ट्राफिक नियंत्रण केलं जाणार आहे.
ही नवीन ट्राफिक मॅनेजमेंट व्यवस्था अमलात आल्यावर ट्राफिक नियम तोडणारे पोलिसांच्या तावडीतून सुटणे मुश्किल आहे
सिग्नल जम्प करणे,हेल्मेट न वापरणे, नो पार्किंग, वन वे विरुद्ध गाडी चालवणे अश्या वाहनाचे नंबर कॅमेऱ्यात पाहून कारवाई करता येणार आहे.ट्राफिक व्यवस्थेवर नजर ठेवता ठेवता क्रिमिनल ऍक्टिव्हिटी वर देखील नजर ठेवता येणार आहे.