बेळगाव शहरात 50 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिकांची संख्या आहे त्यामुळं मोठे शो रूम वर इंग्लिश कन्नड सोबत मराठीत फलक पाटी लावणे जरुरीचे आहे मात्र गेल्या काही दिवसात डी मार्ट, तनिष्क सारखे मल्टी नॅशनल ब्रँड शो रूम्स फक्त इंग्लिश कन्नड ला प्रावधान दिल होत त्यामुळं मराठी ग्राहकांना याचा त्रास होत होता.
गेल्या 4 आकटोबर रोजी गोवावेस येथे तनिष्क शो रूम सुरुवाती पासून कन्नड आणि इंग्लिश मध्ये पाटी लावण्यात आली होती या कंपनीचे दक्षिण भारत प्रमुख अलेक्झांडर यांना बेळगाव तनिष्क फ्रांचयजी संतोष चिंडक आणि अनंत लाड यांनी कल्पना देऊन सदर फलक मराठीत लावण्याची मागणी केली होती . त्यानंतर1 मे महाराष्ट्र दिनी तनिष्क वर मराठीत पाटी झळकला आहे.गेल्या पंढरवड्या पूर्वी तिसरा रेल्वे गेट जवळ डी मार्ट शो रूम वर मराठीला बगल देण्यात आली आहे अनेक मराठी संघटनांनी हा फलक देखील मराठीत लावण्याची मागणी केली आहे मात्र अद्याप याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे