Saturday, December 21, 2024

/

सोशल मीडिया वरील मंडळींनो सावधान

 belgaum

सोशल मीडियावरील अश्लील पोष्टमुळे मागचा आठवडा चांगलाच गाजला. दोन राजकारणी यात अडकले, माध्यमांनी त्यावर मोठे तोंडसुखही घेतले. टीआरपी वाढविण्याच्या स्पर्धेत प्रचंड बदनामीही केली गेली. ते राजकारणी असोत किंवा आणखी कोणीही मुद्दाम असा प्रकार करणार नाहीत. आपल्याकडे आलेली पोष्ट नजरचुकीने फॉरवर्ड केली गेली आणि गोंधळ झाला अशीच त्यांची परिस्थिती झाली असेल, या घटनांनी सोशल मीडिया वर वावरणाऱ्या मंडळींनी सावधगिरीने वागण्याची धोक्याची घंटा मात्र दाखवून दिली आहे, तुम्ही आम्ही सार्यानीच ती ओळखली पाहिजे.
सोशल मीडिया किंवा इंटरनेट वरील साईट्स वापरणे सोपे आहे, मात्र सार्यानाच ते सहज जमेल असे नाही, अर्धवट ज्ञान कधीही वाईटच, म्हणूनच एक तर पूर्ण ज्ञान मिळवा असा सल्ला दिला जातो. सध्या इंटरनेट च्या बाबतीत असेच होत आहे, हातात मोबाईल आला की लगेच व्हाट्सअप्प आणि फेसबुक चे वेध लागतात, त्यातील बारकावे माहीत नसताना आपण वापर सुरू करतो आणि नसते उपद्व्याप होतात. हे उपद्व्याप राजकीय किंवा प्रशासकीय मंडळींच्या हातून झाले की त्याची जोरात चर्चा होते. अशावेळी या चुकांना धीटाईने सामोरे जाणेच योग्य. जितका पळ काढू तितके आरोप वाढत जातात आणि समोरची व्यक्ती जास्त गैरफायदा घेते.
अश्लील पोष्ट ही बाब यातलाच एक भाग, ती वैयक्तिक स्वरूपात ज्याला रुचेल त्याला पाठवली तर फरक पडत नसतो, मात्र त्या नादात ती एखाद्या ग्रुप वर पडली तर गहजब होतो. शिवाय अशा पोष्ट आपण कधी बघत नाही असा आव कोणीच आणू शकत नाही मात्र त्या कुठे टाकल्या जातील यावरून आपली प्रतिष्ठा ठरते याचे भान बाळगायलाच पाहिजे.
माध्यम हाती आले आणि स्वैराचार वाढला की असे प्रकार होतात, म्हणूनच सावधान!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.