अखेर काँग्रेस पक्षात सतीश जारकिजोळी ना मोठं पद मिळालं आहे.आगामी पुढील वर्षी होणाऱ्या विधान सभा निवडणुका लक्षात घेता सतीश जारकीहोळी यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव live ने देखील कालच जारकीहोळी यांना के पी सी सी कार्याध्यक्ष किंवा मोठं पद मिळू शकेल अशी बातमी केली होती त्यामुळं पुन्हा एकदा बेळगाव live च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
सतीश जारकीहोळी यांच्या निवडीची खासदार ए आय सी सी सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी एका पत्रकात ही घोषणा केली आहे. सुरुवातीला जारकिहोळी यांना के पी सी सी कार्याध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता होती मात्र के पी सी सी कार्याध्यक्ष पदी दिनेश गुंडुराव(दक्षिण कर्नाटक) एस आर पाटील(उत्तर कर्नाटक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार असून मंत्री डी के शिवकुमार यांच्यावर निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुख ही जबाबदारी तर माजी मंत्री के एच मुनियप्पा यांची काँग्रेस कार्यकारिणीत खास अतिथी म्हणुन नियुक्ती केल्याची माहिती देखील द्विवेदी यांनी पत्रकात दिली आहे.
सतीश जारकीहोळी यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीत सचिव पदी निवड झाल्याने आगामी निवडणुकीत भविष्यात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येऊ शकते तसच बेळगाव जिल्ह्यातील राजकारणाची चित्रं देखील बदलू शकते असच चित्र सध्या तरी दिसत आहे