Friday, December 27, 2024

/

मराठी लोकप्रतिनिधीना जय महाराष्ट्र म्हणणे पडणार महागात

 belgaum

बेळगाव सह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधी ना आता आपलं मराठी प्रेम महाराष्ट्र प्रेम दाखवणे अंगलट येणार आहे. होय तर कर्नाटक च्या नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी तसा इशारा देखील दिला आहे.


कर्नाटक सरकार आगामी अधिवेशनात कोणत्याही निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात,सभागृहात जय महाराष्ट्र म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्य विरोधी घोषणा दिल्यास त्याच पद सदस्यत्व रद्द करणार असा नवीन कायदा अमलात आणणार आहेत. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी अशी माहिती पत्रकारांना दिली आहे. बेळगाव महा पालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचं देखील रोशन बेग यांनी स्पष्ट केलं आहे.एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरू असताना एकीकरण समितीच्या लोक प्रतिनिधींची अशी ही गळचेपी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.