पुन्हा एकदा बेळगाव live इम्पॅक्ट-
बेळगावातील मराठी लोक प्रतिनिधींनी कर्नाटक विरोधी घोषणाबाजी आणि जय महाराष्ट्र अशी घोषणा दिल्यास नवीन विधेयक करून त्यांच पद रद्द करू या नगर विकास मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधान सभेत देखील पडसाद उमटले आहेत.
महाराष्ट्र शासनाने जी एस टी साठी तीन दिवसीय खास अधिवेशन बोलावले आहे यात सोमवारी सायंकाळी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.शिवसेना आमदार नीलमताई गोऱ्हे यांनी सेना स्टाईल मध्ये हा मुद्दा उपस्थित करून कर्नाटक सरकार ला जाब विचारण्याच आवाहन केलं यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र शासन याबाबत वकिलांचा सल्ला घेईल व कर्नाटकाला विचारणा करेल असे सांगितले. याच बरोबर मुख्यमंत्र्यानी देखील याची गंभीर दखल घेणार असल्याचे सांगितले.
सोमवारी सकाळी 11 वाजता बेळगाव live ने ही बातमी सर्व प्रथम प्रसिद्ध केली होती त्यानंतर सामना, मक्स महाराष्ट्र सारख्या ऑन लाईन पोर्टल आणि मराठी वृत्त वाहिन्यां, वृत्त पत्रांच्या वेब साईटनी देखील चालवली होती याची दखल घेत शिवसेना आमदारांनी हा प्रश्न महाराष्ट्र विधान सभेत मांडला होता.