का आणि कसा गायब झाला माहीत नाही, कधीतरी परतले इतकीच आशा होती, मात्र मलबारी याच्या साथीदारांनी रोहन रेडेकर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि संपूर्ण रेडकर कुटुंबीय दुखावेगात हरवले होते, अखेर त्याच्या शरीराच्या अवशेषांवर आज अंतिम विधी करण्यात आले. रेडकर कुटुंबातील प्रत्येकालाच आपला रोहन परत येणार नाही याचे दुःख अनावर झाले होते.
चोरला घाटात गोवा सीमेवर 100 फूट खोल दरीत सापडलेले रोहन च्या शरीराची कवटी आणि सांगडा डी एन ए टेस्ट साठी पाठविला जाणार आहे.त्यापैकी काही अवशेष बुधवारी रेडकर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले होते, त्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी बेळगाव पोलिसांनी कर्नाटक गोवा सीमेवर स्थानिक लोकांच्या मदतीनं मयत रोहन रेडेकर च्या मृतदेहाचे अवयव शोधण्याची मोहीम राबवली होती.
रोहन परतलाच नाही आणि यापुढे कधीच परतणार नाही याचे दुःख कधीच पुसले जाणार नाही
रोहनच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होवो हीच इच्छा सामान्य बेळगावकर व्यक्त करीत आहेत.
Trending Now