जिल्हा प्रशासनाने वारंवार विनंती करून देखील ऑटो चालकांनी अद्याप मीटर प्रमाणे भाडं आकारले नाही आहे मात्र बेळगाव शिव सेनेच्या रिक्षा सेनेनं मीटर प्रमाणे भाडं आकारण्याचा निर्णय घेत इतर ऑटो चालकांना घरचा आहेर दिला आहे.
सोमवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बेळगाव शहरात शिवसेनेची रिक्षा सेना कार्यरत असून शेकडो ऑटो चालक याच्याशी संलग्न आहेत. ऑटो चालक अंधाधुंद पैसे वसूल करत आहेत याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे त्यामुळं शिवसेने च्या वतीनं हा मीटर ने भाडं आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बेळगाव live कडे नोंदवली आहे
यावेळी 200 हुन अधिक ऑटो ना शिव सेनेचे स्टीकर वाटप करण्यात आले हे ऑटो मीटर प्रमाण भाडं आकारणार आहे
Congratulations to Shivsena Auto driver,s for taken good decision