बेळगाव शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिलेले रेक्स चित्रपट गृह 15 वर्ष झालं बंद पडल असलं तरी आता पुन्हा एकदा आधुनिक तंत्रज्ञानासह लवकरच पुन्हा सुरू होणार आहे.रेक्स थिएटर आता मल्टीप्लेक्स आणि शॉपिंग मॉल मध्ये रूपांतरित होणार आहे.
रेक्स सिनेमा हे एक जुन्या थिएटर पैकी एक असून कॉलेज रोड वर असल्याने याच पूर्वीच्या काळापासून सगळ्यांना एक वेगळंच आकर्षण आहे.
गेल्या 15 वर्षांपूर्वी व्यावसायिकतेच्या स्पर्धेमुळ सिनेमा गृह बंद पडल होत आणि त्या ठिकाणी कॅफे आणि इतर साहित्याचे दुकान सुरू होते नानजी यांच्या ताब्यात असलेलं हे रेक्स थिएटर विकसित करण्याचा निर्णय काही बिल्डर्सनी घेतला आहे त्यानुसार गजानन भांदुर्गे यांच्या पुढाकारातून याचा कायापालट होणार आहे.
या ठिकाणी तसा बोर्ड देखील लावण्यात आला असून या ठिकाणी भव्य व्यापारी संकुल, मॉल बांधण्यात येणार आहे. बिग सिनेमा नंतर रेक्स मॉल मल्टीप्लेक्स बेळगावकरांच्या सेवेस उपलब्ध राहणार आहे.
जुन्या काळात रेक्स थिएटरने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा ‘शोले”तर दिलीप कुमार यांचा ‘कर्मा’ असे अनेक सुपरहिट चित्रपट बेळगाव कारांच्या साठी रेक्स ने दिले होते.
शोले चित्रपटाने तर रेक्स चित्रपटगृहात इतिहास रचला होता.सव्वा रु इंटर तिकिटाचा शोले चित्रपटाच्यावेळी दर होता. तीन रु ऐंशी पैसे बाल्कनीचे तिकीट होते.आज कटिंग चहा देखील तेव्हढ्या पैशात येत नाही.रेक्सला चित्रपट बघायला येण्यामागचे आणखी एक कारण होते.ते म्हणजे रेक्स शेजारी असलेले न्यू ग्रँड हॉटेल.तेथील चविष्ट खाद्यपदार्थ सगळ्यांचे आकर्षण होते.चित्रपट बघायचा आणि न्यू ग्रॅन्डमध्ये जाऊन टोमॅटो ऑम्लेट,कूर्मा पुरीवर ताव मारायचा ,थोडी कमी भूक असेल तर उप्पीट खाऊनच यायचे असा शिरस्ताच होता. आज रेक्स देखील वाहिन्यांच्या आक्रमणामुळे बंद पडले आहे तर न्यू ग्रँड देखील मूळ मालकांनी ताबा घेतल्यामुळे बंद पडले आहे.पण कॉलेज रोडवरून जाताना रेक्स आणि न्यू ग्रँडच्या जागेकडे पाहताना रम्य भूतकाळ आठवतो आणि आठवणी दाटतात.