Wednesday, May 8, 2024

/

बेळगावात ऑटो चालकांच पून्हा आंदोलन

 belgaum

Auto strikeजिल्हा प्रशासन आणि ऑटो चालकातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे ऑटो मीटर सक्ती साठी जिल्हाधिकारी गेली 4 वर्ष प्रयत्नशील असताना ऑटो चालक अनेक कारण पुढे करत चालढकल करत आलेत.

मीटर सक्तीसाठी पोलीस आणि परिवहन विभागाची उदासीनता मूळ सरकार समोर ऑटो चालकांचा संताप सहन करून घ्यावा लागत आहे. सोमवारी ऑटो चालकांनी आणि ड्रायव्हर्स असोसिएशन ने शेकडो ऑटो चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं

शेकडो ऑटो चालक जिल्हाधिकारी कार्यालयात जमले होते त्यांनी मीटर भाडं दोन वर्षे वाढवलं गेलं नाही मीटर भाडं वाढवा तसच अनेक मागण्या मान्य करा या मागणी साठी ऑटो चालकांनी आंदोलन केले आहे 500 ऑटो सरदार मैदानावर पार्क करण्यात आले होते.

 belgaum

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑटो मीटर सक्ती चे आदेश कित्येकदा दिले असले तरी प्रत्यक्षात मीटर सक्ती न केल्याने पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर अंमलबजावणी साठी संशय व्यक्त केला जात आहे.एन जयराम यांनी दिलेल्या आदेश नन्तर पोलीस आणि परिवहन खात्यानं केवळ चार दिवस विनाऑटो मीटर चालवतअसलेल्या रिक्षावर कारवाई करत असल्याचा फार्स केला आहे.
राजकीय दबावामुळे ऑटो कारवाई थाम्बले असे देखील आरोप होतायत.ऑटो चालकांच्या बंद मूळ शहरात बस ची सोय अधिक प्रमाणात सकाळ पासून करण्यात आली होती.एकूणच ऑटो मीटर सक्ती व्हावी अशी मागणी जनतेतुन जोर धरू लागली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.