दुचाकीवरून जाताना पडलेली महिलेची पर्स कर्ले ता. बेळगाव येथील दै. सकाळ चे बातमीदार जोतिबा मुरकूटे यांनी संबंधीत महिलेला परत केली. सुमारे 20 हजार रुपयाचा मोबाईल आणि रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रे होती. काल संद्याकाळी सेंट झेवियर्स शाळेकडून यंदे खुटाच्या दिशेने एका दुचाकीवरून दाम्पत्य जात असताना मधेच दुचाकीवरील महिलेचे पर्स खाली पडले ते मुरकूटे यांनी पहिले व त्या महिलेला हाक दिली पण अंतर जास्त असल्याने त्यांना ऐकू गेले नाही शेवटी मुरकूटे यांनी दुचाकी दामटून यंदे खुंटपर्यंत त्या दाम्पत्याला गाठले अन पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली. या पर्स मध्ये रोख रकमेसह कागदपत्रे व महागडा मोबाईल होता. पर्स मिळाल्याचे पाहून दाम्पत्याने मुरकूटे यांचे आभार मानले
Trending Now