मंथन चापगावकर आणि मयुरी पिंगट नी मिळविला गडाचा राजा आणि राणीचा किताब
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळांने गेली 31वर्ष सतत गडावर चढणे उतरणे स्पर्धा सुरू केल्या आहेत हे शिव जयंती मंडळाचं कार्य कौतुकास्पद आहे असं मत येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती अध्यक्ष परशराम मोटाराचे यांनी व्यक्त केलं आहे.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभात सहभागी झाले होते दरवर्षी मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या वतीने राजहंसगड किल्ला गड चढणे उतरणे स्पर्धा आयोजित केली जाते 5 वर्षाच्या मुला पासून 80 वर्षाच्या वयस्कर पर्यंत सहभाग दर्शवत असतात. यावेळी तुकाराम बँक अध्यक्ष प्रकाश मरगाळे, ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर, अशोक शिंत्रे, दत्ता उघाडे, एस एम जाधव, महादेव पाटील, गणेश दड्डीकर, मदन बामणे, राजू मरवे आदी उपस्थित होते, सूत्रसंचालन नगरसेवक अनंत देशपांडे यांनी केलं