केंद्रातील आर एस एस सरकार अल्पसंख्यांक असलेल्या धर्म भाषा यांच्या विरोधात काम करत आहे त्यामुळं लागलीच भाजप सरकार ला थोपवल नाही तर आगामी काळात देशातील आरक्षण व्यवस्था रद्द होईल त्यामुळं आगामी निवडणुकात भाजप सरकार ला रोखा अस आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर गट)नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.
बेळगवातील गांधी भवनात विविध दलित संघटनांच्या वतीनं आयोजित संविधान बचाओ या मेळाव्यात बोलत होते.यावेळी बेळगाव पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार विवेकराव पाटील,दलित समिती राजाध्यक्ष आर मोहन राजू मललेश चौगुले, अशोक आयांनावर, जयश्री माळगी आदी उपस्थित होते.
भाजप ला रोखण्यासाठी आगामी दोन महिन्यात बंगळुरू येथे संविधान बचाओ रॅली होणार असून यावेळी दहा लाख दलितांनी उपस्थित रहावं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर प्रत्येक दलितांन या आंदोलनात सहभागी व्हावं असंही आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे.
दलितांवर दिवसेंदिवस होणारे अन्याय वाढण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे असा आरोप करत स्वातंत्र्याच्या 70 वर्षा नंतर राज्यघटना (संविधान)वाचवाअस म्हणायची वेळ आज देशावर आली आहे. भगवान बुद्धा पासून संत तुकाराम पर्यंत अनेक समाज सुधारकानी समाज जोडण्याच काम केलंय डॉ बाबासाहेबांनी समाजाला समजदार बनवून क्रांती आणली मात्र आज संकटाची वेळ राज्य घटना वाचवण्याची वेळ देशावर आली आहे यासाठी 2019 मधील लोकसभा आणि कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजप ला सत्ते पासून रोखा असं देखील आंबेडकर म्हणाले
देशात एक व्यक्ती आमच्या जीवनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसी कैवारी समजतात जर त्यांना ओ बी सी वर एवढाच कळवळा असेल तर त्यांनी या समाजाला शैक्षणिक शिष्यवृत्ती का जाहीर करू नये असा सवाल रिपाई देखील आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
देशात 33 टक्के लोक जनावरांच मांस खाणारे लोक राहतात अस असताना 33 टक्के लोकांच्या विरोधात जाऊन गोहत्या बंदी कायदा करणं कितपत योग्य आहे असही ते म्हणाले.